असोदा येथील हॉटेल मालकाचा वादातुन दोघांनी केला खुन

0

जळगाव – शहरातील नेरी स्मशान भूमीलगत असलेल्या एका हॉटेलमध्ये दारू पितांना झालेल्या वादातून हॉटेल मालक प्रदीप ज्ञानदेव चिरमाडे (वय ५० रा. आसोदा ता. जळगाव) यांचा निर्घुण खून झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. दरम्यान मारेकर्या दोघांना पोलिसांनी अटक केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

 

सुमारास नेरी स्मशान भूमीलगत असलेल्या आसोदा मटन हॉटेलमध्ये दोन तरुण दारू पीत बसले होते. यावेळी हॉटेल मालक प्रदीप चिरमाडे यांच्या सोबत त्यांचा वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत होवुन दोघं तरुणांनी चिरमाडे यांच्यावर हल्ला चढविला. यातील एका हल्लेखोराने बिअरची बाटली थेट चिरमाडे यांच्या मानेत खुपसली. यानंतर जखमी अवस्थेत चिरमाडे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Copy