असलोद सेट्रल बँक ग्राहकांना घरपोच पैसे देणार

0


असलोद: शहादा तालुक्यातील असलोद येथील सेट्रल बँकेत दोन दिवसापासुन मोठी गर्दी होत होती. बँकेत गर्दी होऊ नये यासाठी बँकने प्रत्येक गावाचे तारखेनिहाय नियोजन करुन प्रत्येक गावात जावुन स्वाईप मशीनव्दारे प्रत्येकाला घरपोच पैसे देण्याची व्यवस्था केली आहे. बँकेत गर्द्दी होऊ नये

याची खबरदारी घेण्यात आली आहे.
असलोद सेट्रल बँकेला 20-25 खेडे जोडली आहेत. या सर्व गावातील ग्राहक नेहमी बँकेत आर्थीक व्यवहारासाठी येत असतात. शासनाने जनतेला काही अनुदान स्वरुपात पैसे खात्यावर टाकले आहेत. त्यामुळे सेट्रल बँकेत पैसे काढण्यासाठी दोन दिवसापासुन मोठी गर्दी जमा होत होती. त्यामुळे लाँकडाऊनचे व सोसल डिस्टनचे उंलघन होत होते, त्यासाठी पैसे वाटपाचे नियोजन करण्यासाठी शेडुल तयार करण्यात आले, त्यात उजळोद,शोभानगर,वडशील,यागावात राजधर मराठे कमरावद, कर्जोत,लोहारे,गोगापुर,बलसीग ठाकरे,टुकी,कुरंगी,दामळदा, तिजारे,जगदीश सोनवने दुधखेडा,मानमोडा, चीरखान शाम पवार मलगाव, सटीपाणी,भुलाने विजय पावरा असलोद न्यु असलोद,पिपर्डे नानाभाऊ शिदे असे कामकाज सोपविण्यात आले असुन संरपच,पोलीस पाटील, ग्रामसेवकानी याच्याशी सर्पक सादुन गावातील जनतेला मदत करावी तसेच सेन्ट्रल बँकेच्या मँनेजरशी वेळोवेळी सर्पक करुन गावातील लोकांना पैसे काढण्यासाठी योग्य सुचना ध्याव्यातसेच लाँकडाऊन असे पर्यंत असलोद ग्रामपंचायतीला व बी.एस.पी.फाऊडेशनला सहकार्य करावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत.