असलोद येथील ग्रामसेवकाला ३० हजाराची लाच घेतांना अटक

0

नंदुरबार। रस्ता कामाचे बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडून ३० हजार रुपयांची लाच घेताना शहादा तालुक्यातील असलोद येथील ग्रामसेवकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. संदीप गोविंद मराठे यांनी असलोद गावातील दलीतवस्तीत काँक्रीट रस्त्याचे काम केले होते. त्या कामाचा धनादेश काढून देण्यासाठी ग्रामसेवक महेश विनायक पाटील यांनी ३० हजार पाचशे रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ३० हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत संदीप मराठे यांनी नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार आज खाजगी इसमाच्या माध्यमातून३० हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक महेश पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव, पोलिस निरीक्षक करुणाशील तायडे यांनी केली.

Copy