असलोदला बाहेरगावी गेलेल्या 23 मजुरांचा प्रवेश

0

असलोद:शहादा तालुक्यातील असलोद येथील बाहेरगावी मजुरी करण्यासाठी गेलेले हातमजुर गावात परत येत आहेत. त्यात काहींजवळ परवानगी आहे तर काहींजवळ परवानगी नाही. त्यामुळे ते कोठुन आले, याबाबत खबरदारी घेवुन त्यांची तपासणी करण्याची गरज आहे. गावातील प्रशासकीय अधिकारी व ग्रामपंचायतीने योग्य निर्णय घेवुन आलेल्या व्यक्तींना घरात अथवा गावाबाहेर क्वारंटाईन करण्याची गरज आहे. यामुळे प्रशासनाने याबाबत दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

असलोद गावात एकाच दिवशी 23 व्यक्ती बाहेरगावी कामाला गेलेले होते. ते मजुर परत आले आहेत. गावात येणार्‍याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येणार्‍या त्या मजुरांची असलोद उप आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात येत आहे. येणार्‍या त्या सर्व लोकांना घरातच क्वारंटाईन केले आहे. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. जे मजुर आले ते असलोद गावाचेच रहिवाशी असल्याने त्यांची काळजी घेणे हे ग्रामपंचायतीचे काम आहे. परंतु आलेल्या व्यक्तींनी ग्रामपंचायतीला व आरोग्य कर्मचार्‍यांना आपल्या व गावाच्या हितासाठी योग्य मदत करायला पाहिजे, तरच ते स्वताः व गावाला कोरोनो व्हायरसपासून वाचवु शकतात. आलेल्या व्यक्तींनी स्वतःची योग्य काळजी घेतली नाही तर स्वतःला व गावाला येणार्‍या बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागेल. अशी परिस्थिती उद्भवणार नाही, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करुनच गावात प्रवेश दिला जात असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.

Copy