अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलवर एका वर्षाची बंदी

0

सिडनी : वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलवर सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रकारांमधून एका वर्षाची बंदी लादली गेली आहे, अशी माहिती त्याच्या ऑस्ट्रेलियन टी-२० क्लबने दिली. कोणत्याही ऍथलिट-खेळाडूने वर्षातून किमान तीनवेळा उत्तेजक चाचणीसाठी आपली उपलब्धता वाडाच्या दिशानिर्देशानुसार किमान तासभर आधी जाहीर करावी लागते. मात्र, २०१५मध्ये एकदाही आपल्या ‘व्हेअरअबाऊट्स’बद्दल रसेलने माहिती दिली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर जमैकाच्या उत्तेजक प्रतिबंधक आयोगाने त्याच्यावर बंदीची कारवाई केली आहे.

बिग बॅश टी-२० लीगमध्ये सिडनी थंडर या संघाचे २८ वर्षीय आंद्रे रसेल प्रतिनिधित्व करत होता. या हंगामात दुखापतीमुळे माघार घेण्यापूर्वी ५ सामन्यात तो खेळला. नंतर राष्ट्रीय सहकारी कार्लोस ब्रेथवेटने त्याची जागा घेतली. मात्र, आता त्याच्यावर थेट वर्षभराची बंदी लादली गेल्याने हा त्याच्यासाठी मोठा धक्का ठरला आहे. सिडनी थंडरचे व्यवस्थापक निक कमिन्स यांनी याला दुजोरा दिला.