Private Advt

अश्‍लील वर्तन करीत तरुणीची छेडखानी : भुसावळात तरुणाला जमावाने चोपले

भुसावळ : सार्वजनिक स्वच्छतागृहात गेलेल्या 24 वर्षीय तरुणीची छेडखानी करून अश्‍लील वर्तन करणार्‍या 25 वर्षीय तरुणास संतप्त जमावाने चांगलेच चोपून काढल्याची घटना शहरातील जुना सातारा भागात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी शोएब सैय्यद लियाकत (25, लाल बिल्डींगजवळ, भुसावळ) यास आरोपीस शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर अटक केली आहे.

स्वच्छतागृहापर्यंत पाठलाग
24 वर्षीय तरुणीचा आरोपीने पाठलाग करीत जुना सातारा भागात सार्वजनिक शौचालयही गाठत तेथे लघूशंका केली. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या तरुणीने आजूबाजूच्या नागरीकांना हा प्रकार सांगताच आरोपी शोएब यास चोपून काढले. शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात हलवले आहे. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आशा तडवी करीत आहेत.