Private Advt

अश्लिल हावभाव करत विवाहितेचा विनयभंग ; चौघांविरोधात गुन्हा

चाळीसगाव : तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय विवाहितेचा अश्लील हावभाव करीत विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी चार जणांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय विवाहिता आपल्या पती, सासरे, दीर यांच्यासह वास्तव्याला आहे. रविवार, 17 एप्रिल रोजी सायंकाळी एका गावातील कोमलसिंग उत्तम राठोड याने महिलेचा विनयभंग केला तर सागर कोमलसिंग राठोड, राजेंद्र उत्तमसिंग राठोड आणि योगेश राजेंद्र राठोड यांनी विवाहितेचे पती, सासरे व दीर यांना काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अश्लिल शिवीगाळ केली. या प्रकरणी विवाहितेने चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने त्यांच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी कोमलसिंग उत्तम राठोड, सागर कोमलसिंग राठोड, राजेंद्र उत्तमसिंग राठोड, योगेश राजेंद्र राठोड यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक जयंत सपकाळे करीत आहे.