Private Advt

अश्लिल हावभाव करत जळगावातील तरुणीचा विनयभंग : आरोपीला अटक

जळगाव : शहरातील एका भागातील तरुणीशी अश्लिल हावभाव करून तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करणार्‍या संशयीताविरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. अजय विनोद नाडे (जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

तरुणीकडे पाहून अश्लील वर्तन
रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 28 वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून कामाच्या निमित्ताने मंगळवार, 19 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास पायी जात असतांना संशयीत आरोपी अजय विनोद नाडे हा लघूशंका करताना तरुणीकडे पाहून अश्लिल हावभाव केले तसेच तरुणीचे दोन्ही हात पकडून शरीर संबंध ठेवायचे आहेत, असे सांगून विनयभंग केला. तरुणीने या प्रकरणी शनिवार, 23 एप्रिल रोजी दुपारी संशयीत आरोपी अजय नाडेविरोधात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपीला अटक करण्यात आली. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.