Private Advt

अवैध सट्टा क्लबवर पोलिसांची धाड : सहा संशयीतांविरोधात गुन्हा

मुक्ताईनगर : तालुक्यातील मुक्ताईनगर-ईच्छापुर रस्त्यावरील बजरंग ढाब्यामगील पिंप्रीभोजना शिवारात अवैधरीत्या सुरू असलेल्या सट्टा क्लबवर पोलिसांनी सोमवार, 17 रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास छापा टाकत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तीन दुचाकींसह सट्टा व जुगाराची साधने मिळून 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन तालुक्यातील मुक्ताईनगर इच्छापुर रस्त्यावरील बजरंग ढाब्याचे मागील बाजुस रामगड रस्त्यावर अवैध कल्याण मटका नावाचा सट्टा व मटका सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकत शेख इरफान शेख निसार (खिडकीवाडा, वरणगाव), भगीरथ सोनलाल जाधव (जैनाबाद बर्‍हाणपूर), वामन रघुनाथ तायडे (रा.ईच्छापूर), मधुकर एकनाथ मेढे (रा.शहापूर), योगीराज साहेबराव कोळी (रा.बर्‍हाणपूर) यांना ताब्यात घेण्यात आले. संशयीतांकडून तीन हजार रोख, सट्ट्याचे साहित्य व तीन दुचाकी मिळून 63 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पिंप्रीभोजना शिवारातही कारवाई
दुसरी कारवाई पिंप्रीभोजना शिवारातील मुक्ताईनगर ते इच्छापुर रोडवरील मामाश्री गोडावून समोर शिवाय ढाब्याचे शेडचे मागे करण्यात आली. संशयीत विनोद उर्फ अक्षय मुरलिधर देशमुख (अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर) याला कल्याण मटका सट्टा जुगार खेळतांना पकडण्यात आले. संशयीताकडून दोन हजार 575 रुपये रोख व सट्ट्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी कॉन्स्टेबल राहुल बेहेनवाल व कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरुन शेख इरफान, भगीरथ जाधव, वामन तायडे, मधुकर मेढे, योगीराज कोळी व विनोद उर्फ अक्षय देखमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, एएसआय सादीक पटवे, सुनील नागरे, राहुल बेहेनवाल, रवींद्र चौधरी यांच्या पथकाने केली.