Private Advt

अवैध दारुची वाहतूक करणार्‍या वाहनावर कारवाई

शिरपूर। मध्यप्रदेश राज्यातून शिरपूरकडे अवैध दारुची वाहतूक करणार्‍या एका वाहनावर मुंबई-आग्रा महामार्गावर तालुक्यातील चारणपाडाजवळ तालुका पोलिसांनी सोमवारी धडक कारवाई केली. त्यात दोन लाख 25 हजार रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा ताब्यात घेत चार लाख 75 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना सोमवारी, 15 नोव्हेंबर रोजी रात्री मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कारवाई करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी चालक सनी संजय कलाल (रा. वरवाडे शिवार, शिरपूर) यास ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे, महामार्गावरील पळासनेर शिवारात चारणपाडाजवळ पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सोमवारी रात्री 3 वाजेच्या सुमारास सापळा रचला होता. तेव्हा सेंधवाकडून शिरपूरकडे मॅक्स कंपनीची गाडी (क्र. एम. एच22- एम 481) हिला थांबवुन तपासणी केली. तेव्हा त्यात दोन लाख 25 हजार 600 रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा आढळून आला. तसेच दोन लाख 50 हजार रुपये किमतीचे वाहन असा चार लाख 75 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप बाविस्कर करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उप विभागीय पोलीस अधिकारी माने शिरपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ, पीएसआय नरेंद्र खैरनार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नियात शेख, पोहेकॉ. पवन गवळी, पोकॉ. मुकेश पावरा, पोना.रोहीदास पावरा, चालक पोहेकॉ,सईद शेख यांच्या पथकाने केली.