अवैधरित्या दारू घेऊन जाणार्‍या दोघांना अटक

0

भुसावळ । भुसावळ रस्त्यावरील अकलुद ता. यावल जवळील हॉटेल किनारावर विनापरवानगीने अवैध दारु विक्री होत असल्याची गुप्त माहिती सहा.पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना मिळाल्यानुुसार त्यांनी दि.4 मे रोजी पहाटे छापा टाकत 94 हजार 959 रुपयांची देशी, विदेशी दारु, बियर बाटल्या व रोख 20 हजार असा एकूण 1लाख 15 हजार 159 रुपयांचा ऐवज जप्त केला. यात अवैध दारूची विक्री करतांना संशयीत हेमंत पृथ्वीराज फालक (रा.भुसावळ) व गोपाळ पंडित कोळी यांना अटक करण्यात आली.

कारवाईमुळे विनापरवाना दारु विक्रत्यांचे धाबे दणदणाले
सहा.पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केलेल्या कारवाईमुळे विनापरवाना दारु विक्रत्यांचे धाबे दणदणाले आहे. कारवाइनंतर सहा.पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी फैजपूर पो.स्टे पोलीस उपनिरीक्षक मनोहर मोरे, सहा.फौजदार जिजाबराव पाटील, विजय पाचपोळे,नितीन तायडे यांना घटनेची माहिती देऊन आरोपींसह मुद्देमाल ताब्यात दिला. याबाबत सहा.फौजदार विजय पाचपोळे याच्या फिर्यादीवरुन फैजपूर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई करतांना निलोत्पल यांच्यासोबत कॉ. हेमंत झांबरे, विशाल सपकाळे उपस्थित होते. फैजपूर विभागाचा अतिरिक्त पदभार उपविभागीय पोलिस अधिक्षक निलोत्पल यांच्याकडे असल्याने ते रात्री पेट्रोलिंगसाठी या भागात आले असतांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी ही तपासणी केली.