अवैधरित्या तलवार बाळगणार्‍या तरुणास अटक

0

भुसावळ । शहरातील दिनदयालनगर भागात राहणार्‍या तरुणाने आपल्या घरात अवैधरित्या तलवार बाळगल्या प्रकरणी एकास अटक केली आहे. घातक हत्यार लपवून ठेवले असल्याची माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार 17 रोजी दिनदयालनगरातील घराची तपासणी करुन तलवार जप्त केली असून या तरुणास अटक करण्यात आली आहे. याबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरुन विशाल प्रकाश थोरात याच्या घराची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासणी केली असता तलवार आढळून आली. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, सहाय्यक फौजदार नुरोद्दीन शेख, हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे, शरिफ काझी यांच्या पथकाने कारवाई केली.