Private Advt

अवैद्यरीत्या गौणखनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

यावल : तालुक्यातील सावखेडासीम रस्त्यावर अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाने गुरूवारी रात्रीच्या सुमारास पकडले. तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महसुलच्या गस्ती पथकाने गुरूवारी रात्री नायगाव ते सावखेडासिम रस्त्यावर गस्ती दरम्यान एक विना क्रमांकाचे अवैद्यरीरत्या वाळु वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यात आले. हे वाहन वासुदेव संपत तायडे (कोळन्हावी) यांच्या मालकीचे आहे. मंडळाधिकारी सचिन जगताप, मिलिंद देवरे, तलाठी टेंभरसिंग बारेला, वसीम तडवी यांच्या पथकाने कारवाई केली.