अवर ब्लड ग्रुपचे कृणाल महाजन यांना राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार

0

जळगाव । शहरातील अवर ब्लड ग्रुपचे निर्माता कृणाल महाजन यांना सांगलीमधील राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार 2017 घोषित झाला आहे. सोबत चाळीसगाव येथील अवर ब्लड ग्रुपचे सहकारी प्रा. दीपक शुक्ला आणि किशोर देवरे यांनाही या पुरस्कार जाहिर झाला आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे शनिवार 26 फेब्रुवारी रोजी होणार्‍या कार्यक्रमात सातारा विभागाचे पोलीस अधीक्षक आर.आर.पाटील, पुण्यातील रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड, चितळे उद्योग समूहाचे विश्वास चितळे आणि सांगलीच्या जिल्हाध्यक्षा स्नेहल पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. सांगली मधील बॉम्बे ब्लड ग्रुप या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

गेल्या 11 वर्षापासून रक्तदानाविषयी होत जनजागृती
कृणाल महाजन हे गेल्या 11 वर्षापासून रक्तदान संबंधी जनजागृती करीत आहे. अत्यंत गरजेच्या वेळेस रुग्णांना रक्तमिळवून देण्यास त्यांनी अनेकांना प्रोत्साहित केले आहे. कालांतराने सोशल माध्यमांचा वापर करून रक्तदान जनजागृती करण्यास सुरुवात झाली. संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान चळवळ रुजविण्यासाठी रक्ततज्ञ डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात तुषार भांबरे यांच्या सहकार्याने वेबसाईटची निर्मित केली आहे. ( ुुुर्.ेीीलश्रेेवर्सीेीि.लेा ) ही वेबसाईट सध्या महाराष्ट्रात कार्यरत असून, दीड वर्षात सहा हजारावर व्हिजिट आहेत. वेबसाईटची स्थापना झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात 535 रक्तदात्यांच्या माध्यमातून 300 च्यावर गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून दिले आहे. प्रा. दीपक शुक्ल यांनी देखील रक्तदानाची शंभरी पार करत 125 वेळेस रक्तदान केले आहे तर किशोर देवरे हे अपंग असून देखील रक्तदान करीत आहे व रक्तदानास प्रोत्साहन देत आहेत तर कृणाल महाजन यांचे आतापर्यंत 36 वेळा रक्तदान झाले आहे.