अवयवदान प्रचार-प्रसार अभियानास सुरुवात

0

भुसावळ : रोटरी क्लब ऑफ दीपनगरतर्फे आयोजित अवयवदान प्रचार व प्रसार अभियानाचे मुख्य अभियंता अभय हरणे, उपमुख्य अभियंता माधव कोठूळे, नितिन गर्गे आणि वरीष्ठ अभियंत्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवार 15 रोजी सकाळी 11 वाजता नविन क्लब येथे करण्यात आले. या प्रसंगी रोटरीचे सुनील देशपांडे यांनी अवयवदान जनजागृती प्रचार व प्रसाराबाबत माहिती दिली.
मुख्य अभियंता यांनी या विधायक कार्यासाठी रोटरी दिपनगरची प्रशंसा केली. सुनील देशपांडे हे वयाच्या 67 व्या वर्षी पदयात्रा करून समाजीपयोगी कार्य करीत आहेत त्यांना माझा मानाचा सलाम करुन त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दिपनगरच्या शारदा हायस्कुलच्या विद्यार्थ्यानी प्रभातफेरीद्वारे सुनिल देशपांडे यांचे स्वागत केले. मग संपूर्ण वसाहतीमधून रॅली जाऊन शेवटी नवीन क्लब येथे कार्यक्रमस्थळी पोहोचले. याप्रसंगी सर्व रोटरीयन्स आणि दीपनगरवासीयांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दिली. रोटरी दीपनगरचे अध्यक्ष प्रविण बुटे यांनी प्रास्ताविक केले. सचिव आनंदगीर गोसावी यांनी ओळख करून दिली. तर आभार जे. पी. पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन कोषाध्यक्ष मोहन सरदार यांनी केले. वाय.जी. सिरसाट, आर. पी. निकम, अखतर तडवी, जी. डी. चौधरी, संजय भटकर यांचे सहकार्य लाभले.