Private Advt

…..अवघ्या काही तासाच संशयितास शहर पोलिसांनी केले जेरबंद

शिरपुर – शहरालगत असलेल्या खरदे शिवारातील शनिमंदिर जवळ अरुणावती नदी पात्रातील वीटभट्टीवरील कामगारांच्या झोपडीतून ४ मोबाईल चोरीस गेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयितास अवघ्या काही तासातच ताब्यात घेतल्याची कारवाई शहर पोलिसांनी २६ जानेवारी रोजी केली आहे. याप्रकरणी विजय उर्फ पिंटू गोरख साळवे रा.वडाळी ता.शहादा जि नंदुरबार असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याने गुन्ह्याची कबुली देत चारही मोबाईल काढून पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत
     सदर चोरीची घटना २६ जानेवारी २०२२ रोजी पहाटेच्या२ वाजेच्या सुमारास घडली होती. याबाबत शहर पोलीस ठाण्यात सकाळी प्रताप सुकलाल पावरा याने तक्रार दाखल केली होती.अरुणावती नदी पात्रातील वीटभट्टीवर कामगार असलेले प्रताप सुकलाल पावरा,मुकेश मन्साराम भिल, मयूर मुकेश भिल,पिंटू बासकुले पावरा या कामगारांचे १५ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल अज्ञाताने चोरून नेल्याची तक्रार दिल्याने २६ जानेवारी रोजी सकाळी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अवघ्या काहि तासातच संशयित विजय गोरख साळवे यास मुद्देमालासह ताब्यात घेत अटक केली
        सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव,व शिरपुरउप विभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख,शिरपुर शहर पोलीस ठाण्याचे डी.बी. पथकाचे पोहेकॉ ललित पाटील,लादूराम चौधरी,विनोद सरदार,पोकॉ गोविंद कोळी, विनोद अखडमल,प्रविण गोसावी, मनोज दाभाडे,मुकेश पावरा,अनिल अहिरे व प्रशांत पवार यांनी केली.