अल्पवयीन मुलीस पळवून नेणार्‍यास पोलीस कोठडी

0

जळगाव । हरी विठ्ठलनगर परिसरातील अल्पवयीन मुलीला दोन भावांनी 18 मार्च रोजी फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या पोलिसांनी एका संशयिताला 30 मार्च रोजी अटक केली होती. त्याला जामीन मिळाला आहे. तर दुसरा संशयीताला शनिवारी रात्री अटक केली. त्याला सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. शिंदे यांच्या न्यायालयात हजर केेले असता त्यांनी 5 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

न्यायालयात केले हजर
हरीविठ्ठल नगरातील नरेश उर्फ बाळा जगदीश सोनवणे (वय 20), प्रदीप उर्फ गोलू जगदीश सोनवणे (वय 23) यांनी 18 मार्च रोजी अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. या प्रकरणी पोलिसांनी नरेशला 30 मार्च रोजी अटक केली होती. तर प्रदीप ला शनिवारी अटक केली. त्याला न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 5 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.

दादर चोरट्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
जळगाव। फुपनगरी शिवारातील शेतातून 6 क्विंटल दादरची चोरी करणार्‍या दोन संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत रविवारी संपली. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. शिंदे यांच्या न्यायालयात हजर केेले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. फुपनगरी शिवारातील सुधीर जगन्नाथ सपकाळे, अनिता राजेश भोई यांच्या शेतातून 26 मार्च रोजी रामचंद्र देवचंद सपकाळे (वय 79, रा. कानळदा), प्रशांत श्यामकिरण सपकाळे (वय 18), श्यामकिरण राजेंद्र सपकाळे, मंगल प्रभाकर पाटील यांनी 9 हजार रुपये किमतीची 6 क्विंटल दादर चोरून नेली होती. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी 29 मार्च रोजी रामचंद्र सपकाळे आणि प्रशांत सपकाळे यांना अटक केली. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत रविवारी संपली. त्यांना न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता. त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.