Private Advt

अल्पवयीन मुलीस पळवले : खंडाळा गावातून आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव : अमळनेर शहरातून अल्पवयीन अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपीसह पीडीत मुलीला भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथून जळगाव गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. रोशन गणेश राणे (राजपूत, रा.इंदीरा नगर, अडावद, ता.चोपडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दोघांना अधिक कारवाईसाठी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
अमळनेर येथून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी 23 एप्रिल 2020 रोजी गुन्हा दाखल होता. संशयीत आरोपीबाबत जळगाव गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, सहायक फौजदार अशोक महाजन, हवालदार लक्ष्मण पाटील, पोलिस नाईक किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण जाधव, वैशाली सोनवणे, विनोद पाटील, चालक मुरलीधर बारी आदींनी संशयीत आरोपीसह पीडीतेला मोंढाळा, ता.भुसावळ येथून ताब्यात घेतले व अधिक कारवाईसाठी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले.