अल्पवयीन मुलीवर जंगलात अत्याचार ; जामनेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

A minor girl from Jamner Taluka was assaulted by taking her to the forest on the pretext of fetching wood जामनेर : शहरातील एका भागातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला जंगलात लाकूड वेचण्याच्या बहाण्याने तसेच पीडीतेची आई घरात नसताना वारंवार अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी 47 वर्षीय नन्हा नजाकत खान या प्रौढाविरुध्द जामनेर पोलिसात सोमवारी रात्री अत्याचार व पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला.

विविध कलमान्वये गुन्हा
पीडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, आहे. त्यानुसार 20 जुलै 2022 रोजी 4 वाजेच्या सुमारास नन्हा नजाकत खान (47, जामनेर) याने पीडीत मुलीला लाकूड वेचायला चल, असे सांगून जंगलात तिच्यावर अत्याचार केला तसेच घटनेची वाच्यता केल्यास मारून टाकण्याची व आईला जंगलात फेकून देण्याची धमकी दिली. यानंतर पीडीतेची आई घरी नसल्याचा फायदा घेत संशयीत आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. याबाबत पीडितेच्या आईने सोमवारी रात्री तक्रार दिल्याने खान याच्याविरुद्ध भादंवि कलम 376 (2) (ज) (न) सह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक दिलीप राठोड करीत आहेत.