अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव : पहूर-शेंदुर्णीदरम्यानच्या एका शेतात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना 20 ते 26 ऑगस्टदरम्यान घडली होती. या प्रकरणी शुक्रवारी पिंपळगाव हरेश्‍वर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पसार आरोपीच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. धरम मोईदीन तडवी (31, रा.नवी सांगवी, पहुर, ता.जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. संशयीत तडवी हा फत्तेहपूर येथील गोदरी तांडामधील एका शेतात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास शनिवारी अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या मुसक्या
जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, एएसआय अशोक महाजन, नाईक किशोर राठोड, नाईक रणजीत जाधव, नाईक कृष्णा देशमुख, कॉन्स्टेबल विनोद पाटील आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला अधिक कारवाईसाठी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Copy