Private Advt

अल्पवयीन मुलीला जळगावातून फूस लावून पळविले

जळगाव : शहरातील एका भागात राहणार्‍या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल
रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी 16 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियासह वास्तव्यास आहे. सोमवार, 20 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात कुणालाही काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाली. मुलीच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली परंतु ती आढळून न आल्याने मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा आरोप मुलीच्या आईने करीत या प्रकरणी मंगळवार, 21 डिसेंबर रोजी रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सुनील पाटील करीत आहेत.