अल्पवयीन मुलीचे अपहरण करीत अत्याचार : दोघांविरोधात गुन्हा

दोंडाईचा : अल्पवयीन विद्यार्थिनीचे चाकूच्या धाकावर अपहरण करीत अत्याचार करण्यात आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी दोघांविरोधात दोंडाईचा पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकीवरून केले अपहरण
एका शहरातील 17 वर्षीय विद्यर्थिनी शुक्रवार, 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी भाऊबीजनिमित्त नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दोंडाईचा शहरातील बसस्थानकाजवळ असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये आली असता संशयीत आरोपी अलताफ आजम शेख (दोंडाईचा) हा आला व त्याने विद्यार्थिनीला तुझ्याशी बोलायचे आहे, असे सांगून दुचाकीजवळ नेले. तेथे तोंडाला रुमाल बांधून एक जण थांबलेला होता. त्यावेळी शेखने पँटच्या खिशातून चाकू काढून तुझ्या पोटात खोपसेल, अशी धमकी देत अलताफ शेखने पीडीतेचे तोंड दाबून दुचाकीवर बसविले व तोही दुचाकीवर बसला व त्याने नंदुरबार शहराकडे त्या संशयीत मुलासह दुचाकी नेण्यास सांगितले. सायंकाळी नंदुरबार बसस्थानकाशेजारी असलेल्या एका रेस्ट हाऊसवर नेत संशयीत अलताफने एका खोलीत नेत पीडीतेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दुचाकीवरून दोंडाईचा येथील अमरावती नदीजवळील रोडवर सोडून दिले, अशी तक्रार पीडिताने दोंडाईचा पोलीस ठाण्यात दिल्यावरून संशयीत अलताफ आजम शेख व तोंडाला रुमाल बांधलेला मुलगा (नाव, गाव माहित नाही) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.