Private Advt

अल्पवयीन मुलीचा विनयभंग : वनरक्षकाविरोधात गुन्हा

यावल : तालुक्यातील सातपुड्याच्या पर्वताच्या दुर्गम क्षेत्रात असलेल्या लगडाआंबा येथील 3 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी वनरक्षक रमेश बाबुता थोरात याच्याविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. लंगडाआंबा या आदिवासी वस्तीत मंगळवार, 13 जुलै रोजी अल्पवयीन मुलगी भावंडासोबत असताना यावेळी आरोपी रमेश थोरात यांनी विनयभंग केला. ही घटना पीडीतेने 14 रोजी आईला सांगितल्यानंतर चौकशीअंती पीडीतेच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.