अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; यावलमध्ये एकाविरुद्ध गुन्हा

0

यावल- इयत्ता सहावीत शिक्षण घेणार्‍या बारा वर्षीय अल्पवयीन मुली सोबत अश्लील प्रकार केल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकारामुळे समाज मन सुन्न झाले आहे. तर ज्या नराधमाने हे कृत्य केले पिडीत ही संशयीताच्या पुतणीची मैत्रीण आहे.
शहरातील बाबानगर मधील रहिवासी इयत्ता सहावीत शिक्षण घेणारी 12 वर्षीय पिडीत सोमवारी (त्याच भागात असलेल्या एका दुकानावर गेली होती तेथे संशयीत शेख जुबेर शेख लाल यांने तिला व तिच्या चुलत भावास दुचाकीवर फिरवण्याचे आमिष दाखवले व दुपारी तीन वाजेला तिला घेवुन बंद सुतगिरणी परीरसरात नेले व तिथे त्यांच्याशी अंगलटपणा करीत तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा व लैगिक अत्याचाराचा प्रयत्न केला असता लहान चुलत भाऊ खुपचं रडायला लागला व पीडीतदेखील रडायला लागल्याचे पाहून तिला संशयीताने दम देत पुन्हा दुचाकीवर बसवून बाबानगरात तिच्या घरा पासुन काही अंतरावर सोडले तर या प्रकाराने भयभीत झालेल्या बालिकेने हा प्रकार बुधवारी कुटुंबीयास सांगितला तेव्हा पीडीताचे कुटुंबियांनी व नातलगांनी यावल पोलिस ठाणे गाठले व संशयीताविरूध्द गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोेलिस उपनिरिक्षक सुनीता कोळपकर, संजय तायडे करीत आहे.

Copy