अल्पवयीन तरुणीने लग्नानंतर दिला बाळाला जन्म :

A minor girl gave birth to a baby after marriage : Bhadgaon Police registered a case against a minor ! भडगाव : भडगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीशी विवाह केल्यानंतर तिच्याशी शारीरीक संबंध ठेवल्यानंतर पीडीतेने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून संशयीत अल्पवयीन मुलाविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मंदिरात जावून केले लग्न
2021 मध्ये भडगाव तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका 12 वर्षीय मुलीसोबत कोणास काही एक न सांगता मंदिरात जाऊन लग्न केले तसेच तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. यातून पीडीता गरोदर राहिली. त्यानंतर 2022 मध्ये पीडीतेने एका मुलास जन्म दिला. या प्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीवरून बालविवाह प्रतिबंध, पोस्को आणि बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करीत आहेत.