अल्पवयीन तरुणाच्या अत्याचारातून 19 वर्षीय तरुणी गर्भवती

A Young Woman In Yawal Taluka Got Pregnant Due To Torture : A Crime Against The Youth यावल : अल्पवयीन तरुणाकडून झालेल्या अत्याचारातून 19 वर्षीय तरुणी गर्भवती राहिल्याची धक्कादायक बाब तालुक्यात उघडकीस आली असून या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रेमसंबंधानंतर केला अत्याचार
19 वर्षीय पीडीत तरुणीच्या फिर्यादीनुसार 2021 पासून वेळोवेळी पीडीत तरुण इतर महिलांसोबत शेत-मजुरीसाठी कामासाठी शेतात जात असता तिची ओळख 16 वर्षीय अल्पवयी तरुणासोबत झाली. त्यानंतर संशयीताशी ओळख वाढल्यानंतर त्याने प्रेमसंबंध निर्माण केले तसेच पीडीतेस धमकी देवून तिच्यावर जबरदस्ती केळीच्या शेतात वारंवार अत्याचार करण्यात आला व त्यातून पीडीता गरोदर झाली. शनिवार, 1 ऑक्टोंबर रोजी पीडीतेने यावल पोलिसात फिर्याद दिल्यावरून अल्पवयीन तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक सुदाम काकडे हे करीत आहेत. दरम्यान, संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला आज बालन्यायालयात हजर करण्यात येणार आहे.