अल्पमुदतीच्या शेतीकर्जांना ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ

2

नवी दिल्ली : देशभरातील कोट्यवधी शेतकर्‍यांनी शेतीसाठी आणि शेतीशी संबंधित अन्य कामांसाठी बँकांकडून घेतलेल्या तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या शेतीकर्जांच्या परतफेडीची मुदत येत्या ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
यामुळे ज्या शेतकर्‍यांच्या अशा कर्जाच्या परतफेडीची रक्कम यंदाच्या १ मार्चपासून नंतर देय झाली असेल त्यांना ही परतफेड आता ३१ ऑगस्टपर्यंत करता येईल. ही कर्जे शेतकजयांना चार टक्के अशा सवलतीच्या व्याज दराने दिली जातात. यापैकी दोन टक्के व्याजाचा हिस्सा केंद्र सरकार बँकांना देते, तर कर्जाची वेळेवर परतफेड केली तर शेतकजयांना व्याजात तीन टक्क्यांची सवलत मिळते. या निर्णयामुळे शेतकर्‍यांना परतफेडीसाठी आणखी मुदत मिळेलच, शिवाय वाढीव मुदतीत परतफेड करूनही त्यांना व बँकांना व्याजदरातील फायदे पूर्वीप्रमाणेच मिळतील.

Copy