अर्थे गावानजीक अपघात; मोटारसायकलस्वार जागीच ठार

0

शिरपूर: शहादा रस्त्यावरील अर्थे गावाच्यानजीक असलेल्या म्हाळसाई पेट्रोल पंपाजवळ ट्रक व मोटारसायलचा भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना घाली आहे. रविवारी ८ रोजी सकाळी हा अपघात झाला. गंगाराम पावरा (धाबापाडा) असे मयताचे नाव आहे. शिरपूरकडे जाणाऱ्या जीजे- 01 बीवी-1599 या ट्रकने अर्थे येथील म्हाळसाई पेट्रोल पंपाजवळ मोटारसायकला जोरदार धडक दिली. या धडकेत मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने पळ काढला मात्र त्याला पकडण्यात आला.

Copy