LIVE अर्थसंकल्पीय अधिवेशन: पहिल्याच दिवशी सभागृहात गदारोळ !

0

मुंबई: आजपासून महाविकास आघाडी सरकारचे आज पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. पहिल्या दिवसाच्या कामकाजाने अधिवेशनाला सुरुवात झाले असून पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष भाजपने कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सभागृह सुरु होताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करावी अशी मागणी केली. त्यानंतर भाजपकडून सभागृहात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन गदारोळ करण्यात आला. शेतकरी विरोधी सरकार असल्याचे आरोप निषेधार्थ भाजपने सभागृहात घोषणाबाजी केली.

सभागृहाच्या पटलावर विविध विभागाच्या निर्णयाचे अध्यादेश मांडण्यात आले.

Copy