अर्थसंकल्पाचे शेअर मार्केटकडून जोरदार स्वागत

0

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे शेअर माकेॅटने जोरदार स्वागत केले आहे. बाजार उघडाच ४४३ अंकांची उसळी घेतेल्या सेन्सेक्सने १५०६ अंकानी उसळी घेतली. तर निफ्टीनंही ४१८ अंकाची वाढ नोंदवली आहे.
शेअर बाजाराचे व्यवहार सुरु होताच सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ४४३ अंकांच्या वाढीसह ४६,७२८ अंकांसह सुरू झाला आहे. तर निफ्टी ११४.८५ अंकांच्या वाढीसह १३,७४९.४५ वर उघडला. अर्थमंत्र्यांनी जवळपास सर्वच क्षेत्रात ठोस व आश्‍वासक घोषणा केल्याने टप्प्या टप्प्याने शेअर बाजार उसळी घेत होता.

या मुद्यांमुळे वाढला सेन्सेक्स

विमा कायदा १९३८ मध्ये बदल करण्यात आले आहेत. विमा क्षेत्रात आता ७४ टक्क्यांपर्यंत थेट परकीय गुंतवणूक करता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा ४९ टक्के इतकी होती. याव्यतिरिक्त गुंतवणुकदारांना चार्टर तयार करण्यास सांगण्यात आलं आहे, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या. यावेळी अर्थमंत्र्यांनी काही स्टार्टअप कंपन्यांसाठी घोषणा केली. या अंतर्गत जवळपास एक टक्के कंपन्यांना कोणत्याही अडचणींशिवाय सुरूवातीला काम करण्याची मंजुरी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

बीपीसीएल, भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड सारख्या कंपन्यांमधील निर्गुंतवणूक २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं. निर्गुंतवणुकीसाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. अनेक कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया येत्या वर्षात पूर्ण होणार आहे. २०२२ या आर्थिक वर्षांत १.७६ लाख कोटींच्या निर्गुंतवणुकीचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. याच आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओदेखील आणण्यात येईल. याव्यतिरिक्त खऊइख मध्येही निर्गुंतवणूक केली जाईल. बीपीसीएल, एअर इंडिया, आयडीबीआय, एससीआय आणि कॉनकोरमधील निर्गुंतवणुकीची प्रक्रिया २०२१-२२ याआर्थिक वर्षात पूर्ण होणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वीज क्षेत्रासाठीही मोठी घोषणा केली. या क्षेत्रासाठी सरकारडून ३ लाख कोटींची स्कीम लाँच केली जाणार आहे. याअंतर्गत देशातील वीज क्षेत्राशी निगडीत पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याचं काम केलं जाणार असल्याचं त्या म्हणाल्या. सरकारकडून हायड्रोजन प्लांट तयार करण्याचीही घोषणा करण्यात आली. वीज क्षेत्रात झझझ मॉडेल अंतर्गत अनेक प्रकल्प पूर्ण केले जाणार असल्याचंही सीतारामन म्हणाल्या.

भारतात मर्चंट शिप्सना चालना देण्यासाठीही काम केलं जाणआर आहे. सुरूवातीला यासाठी १६२४ कोटी रूपये देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त गुजरातमध्ये सध्याच्या प्रकल्पात शिप रिसायकल करण्यावरही काम केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Copy