अर्थव्यवस्थेत सुधारणा; ऑक्टोंबरच्या जीएसटी कलेक्शनमध्ये वाढ

0

नवी दिल्ली: कोरोनामुळे अर्थव्यस्थेला मोठा फटका बसला आहे. सर्वच क्षेत्र मंदीच्या सावटाखाली आहे. त्याचा परिणाम जीएसटी (GOODS AND SERVICE TAX )वर झाला आहे. लॉकडाऊनमुळे जीएसटी कलेक्शन कमी झाले आहे. मात्र आता हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असून जीएसटी कलेक्शन देखील वाढले आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोंबरच्या जीएसटी कलेक्शनमध्ये ९ हजार ७४५ कोटींनी वाढ झाली आहे. सप्टेंबरचे जीएसटी कलेक्शन ९५४१० कोटी होते तर ऑक्टोंबरचे जीएसटी कलेक्शन १ लाख ५ हजार १५५ कोटी इतके आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येनाय्स सुरुवात झाल्याने आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

लॉकडाऊनचे निर्बंध हटवल्यामुळे आर्थिक पुनरुज्जीवन होत आहे.

Copy