अर्थव्यवस्था सावरतेय: अर्थमंत्र्यांकडून आर्थिक पॅकेजची घोषणा

0

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे सांगितले. कोरोनाचे रुग्ण घटल्याने अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन काही आर्थिक घोषणा करणार असल्याचे सांगितले.

कोरोना रुग्ण संख्या घटत असल्याने त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होत आहे. अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल दिसून येत आहे. अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु आहे असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले.

परदेशी गुंतवणुकीत वाढ झाली आहे. देशातील गुंतवणूक देखील वाढली आहे. मागील महिन्यात रेकोर्ड ब्रेक जीएसटी महसूल जमा झाला आहे असेही अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
१. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना २५ हजार कोटी वितरीत करण्यात आले.

२.किसान क्रेडीट कार्डसाठी देशातील १ कोटी ८३ लाख १४ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १ कोटी ५७ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड मंजूर करण्यात आले.

३. आत्मनिर्भर भारत अंतर्गत फेरीवाल्यांना कर्ज देण्यात येणार आहे. त्यासाठी देशातील २६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केला.

Copy