अर्थव्यवस्थेची गती मंद, रुळावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न: आरबीआय

0

नवी दिल्ली: सध्या कोरोनामुळे सर्वच घटक आर्थिक अडचणीत सापडले आहे. अनेकांचा रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ आली आहे. दोन आठवड्यापूर्वी भारताचा जीडीपी खाली गेल्याने आर्थिक परिस्थिती चिंताजनक असल्याचे उघड झाले. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सरकार आणि आरबीआयकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा केला जातो आहे. दरम्यान आज फिक्कीच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत बोलतांना गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अर्थव्यवस्थेवर भाष्य केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे, अद्यापही गती पकडलेली नसून ती हळूहळू रुळावर येणार आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून मोठ्या प्रमाणात रोख रकमेच्या उपलब्धतेमुळे सरकारला कमी दराने आणि कोणत्याही अडचणीशिवाय मोठ्या प्रमाणात कर्ज दिले गेले आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक असलेली पावले उचलण्यास केंद्रीय बँक पूर्णतः तयार आहे.

कोरोनामुळे जीडीपीत घसरण झाल्याचे सांगण्यात आले आहे. कर्जाची किंमत खूप खाली गेली आहे, मागील दशकातील ही पहिलीच वेळ आहे. अत्यल्प रोख उपलब्धतेमुळे सरकारची कर्ज घेण्याची जोखीम अत्यंत कमी आहे आणि गेल्या दहा वर्षात सध्या बाँडच्या माध्यमातून येणारे उत्पादन कमी स्तरावर आहे असेही त्यांनी या बैठकीत सांगितले. शिक्षणाने आर्थिक विकासाला हातभार लावला आहे, असे एक नवीन शिक्षण धोरण ऐतिहासिक आहे आणि नवीन काळातील सुधारणांसाठी ते आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले.

बर्‍याच रेटिंग एजन्सींनी चालू आर्थिक वर्षात भारताच्या विकासदरात घट होण्याची शक्यता वर्तविली आहे.

Copy