अर्थमंत्र्यांना गुलाबराव म्हणाले पाणी मंत्री : गिरीश महाजन म्हणाले अण्णांची करायचीच मनधरणी

0

फैजपूरात नेत्यांच्या फटकेबाजीने शेतकर्‍यांमध्ये हास्य कल्लोळ

फैजपूर- राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या वेगळ्या शैलीत व्यासपीठावरील मंत्र्यांची ओळख करून देत त्यात सुधीर मुनगंटीवार यांना राज्याचे गल्ला मंत्री संबोधले तर गिरीश महाजन यांना पाणी मंत्री अशी ओळख करून दिली. जलसंपदा गिरीश महाजन म्हणाले की,
कार्यक्रम संपताच राळेगण सिद्धीला जायचे आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गांधी जयंतीपासून उपोषणाला बसणार आहे, त्यांची मनधरणी करायची आहे मोठी जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे, असे सांगताच हास्याची लकेर उमटली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, या जिल्ह्याचे प्रश्न कधीही सुटू शकतात कारण गिरीश महाजन यांच्याकडे तीन मंत्री पदे आहेत. एक जलसंपदा मंत्री तर दुसरे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि तिसरे व अतिशय महत्वाचे खाते म्हणजे ते मुख्यमंत्री यांच्या अतिशय जवळचे मंत्री आहेत. एकवेळ माझी फाईल परत येवू शकते पण गिरीश महाजनांची फाईल कधीही परत येत नाही त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचे प्रश्न कधीही सुटू शकतात त्यामुळे जिल्ह्याचा विकास कुणीच थांबवू शकत नाही या वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. राज्यमंत्री गुलाबराव पाटलांच्या वाक्याचा धागा पकडत माजी मंत्री खडसे म्हणाले की, मुनगंटीवार गल्ला मंत्री असलेतरी गल्ला भरू नक्कीच नाही, या त्यांच्यावर वाक्यावर खसखस पिकली

Copy