अर्थमंत्री जेटली मांडणार अर्थसंकल्प

0

नवी दिल्ली । वृत्तसंस्था अर्थमंत्री अरुण जेटली बुधवारी चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करत असून, त्यात सर्वसामान्यांसाठी सवलतींचा वर्षांव होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः प्राप्तिकर वजावटीत आणि गृहकरजवरील व्याजाचया सवतीत आणकी वाढ केली जाणार का, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

अर्थसंकल्पाबाबत अनेकांना लागली उत्सुकता
आर्थिक विकासाला चालना देण्याचे आव्हानही त्यांच्यापुढे आहे.नोटाबंदीमुळे आर्थिक घडामोडींना बसलेला फटका, वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) वाहत असलेले वारे, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती गेलेली अमेरिकेची सत्ता, अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पार्श्‍वभूमीवर जेटली यांचा हा अर्थसंकल्प कसा असणार, याबाबत उत्सुकता आहे. यावेळी प्रथमच फेब्रुवारीच्या प्रारंभी अर्थसंकल्प सादर होत आहे. तसेच, रेल्वे अर्थसंकल्प वेगळा न मांडता तो जनरल बजेटचाच एक भाग बनवण्यात आला आहे.