अर्णब गोस्वामी विरोधात सर्वच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार

0

मुंबई : रिपब्लीक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीने बार्कचे माजी सीईओ पार्थो दास गुप्ता यांच्या सोबत व्हाटसअपववरील संवाद उघड झाले आहे. यात दोघांमध्ये सैन्य दलाच्या गुप्त कारवाईवर भाष्य करण्यात आले आहे. भारतीय सैन्य दल करणाऱ्या कारवाईबाबत कमालीची गुप्तता असते, मात्र तीन दिवस आधीच ही माहिती अर्णब गोस्वामीला कशी मिळाली? असा सवाल उपस्थित होत असून यावरु राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा समर आला आहे. कॉंग्रेसने अर्णब गोस्वामीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कॉंग्रेसकडून देशभरात आंदोलन केले जात आहे. दरम्यान आता कॉंग्रेसने आणखी मोठे पाऊल उचलले आहे. याविरोधात केंद्र सरकारने काहीच पाऊले न उचलल्याने कांग्रेसने आता मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील सर्वच पोलीस ठाण्यात कॉंग्रेसकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी ही घोषणा केली आहे.

मुंबईतील काँग्रेस कार्यकर्ते, नेते मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहेत. तसेच अर्णब यांच्या अटकेची मागणी करणार आहेत.

Copy