अर्णबच्या अडचणीत वाढ; हक्कभंगावर कामकाज सुरु

0

मुंबई: रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वेय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी काल बुधवारी अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. सुसाईड नोटमध्ये अर्णबचे नाव असल्याने अर्णबला अटक झाली आहे. दरम्यान अर्णब गोस्वामीला काल अलिबाग कोर्टाने १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी दिली आहे. दरम्यान अर्णब गोस्वामीच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. विधानसभेत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला होता, यावर आज गुरुवारी कामकाज होत आहे. कामकाजाला सुरुवात झाली आहे. हक्कभंग समिती हक्कभंगाच्या प्रस्तावावर कामकाज करत आहे. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर या समितीचे प्रमुख आहे. दरम्यान काय निर्णय होणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.