‘अर्जुन रेड्डी’च्या या हिंदी रिमेकमधील शाहिदचा लूक प्रदर्शित

0

मुंबई : बॉलीवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर ‘पद्मावत’नंतर कुठल्या चित्रपटांमधून दिसणार याबद्दल चर्चा सुरू होती. पद्मावतनंतर तो प्रथमच ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटात झळकला, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर अपयशी ठरला. आता तो ‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. त्याचा फर्स्ट लूक शाहिदने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘अर्जुन रेड्डी’च्या या हिंदी रिमेकचं नाव ‘कबीर सिंग’ असं आहे. या रिमेकमध्ये शाहिदसोबत कियारा अडवाणी झळकणार आहे. ‘कबीर सिंग’ हा चित्रपट २१ जून २०१९ रोजी प्रदर्शित होनार अशी माहिती मिळाली आहे. यामध्ये शाहिद वैद्यकिय शाखेतील विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Copy