अर्जुन मलायकाने खरेदी केला ‘सपनो का महल’

0

मुंबई- मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या संबंधाविषयी सध्या खूपच चर्चा सुरु आहे. दोघेही लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. अनेकदा त्यांनी स्वत:या चर्चेला दुजोरा देखील दिला आहे.

मी सिंगल नाही, असे खुद्द अर्जुन कपूरने जाहिर केले आहे. दोघेही अगदी बिनधास्त एकमेकांसोबत फिरताना दिसत आहेत. दरम्यान एक नवीन माहिती समोर आली आहे. मलायका व अर्जुनने घरही खरेदी केले आहे. मलायका व अर्जुनने मुंबईच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये एक अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. लग्नानंतर मलायका व अर्जुन या फ्लॅटमध्ये शिफ्ट होतील, असे मानले जात आहेत.

अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाने अर्जुनसोबतचे रिलेशन उघडपणे स्वीकारले आहेत. आधी दोघेही कॅमेऱ्यांपासून लपूनछपून वावरत. पण गेल्या एक दोन महिन्यांत दोघेही जगाची पर्वा न करता एकत्र दिसत आहेत.

अलीकडे ‘कॉफी विद करण 6’ या चॅट शोमध्ये बोलताना अर्जुनने अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिलेत. शोचा होस्ट करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारला. यावर मी सिंगल नाही, असे अर्जुन म्हणाला. अर्जुनच्या या खुलाशाने त्याची बहीण जान्हवी कपूर हिलादेखील आश्चयार्चा धक्का बसला. तुझ्या पार्टनरला तुझ्या कुटुंबियासोबत कधी भेटवणार, असे करणने विचारल्यावर,माझ्या कुटुंबासमोर आता मी कबूल केलेच,असे त्याने सांगितले. त्यावर मला आत्ता इथे ही गोष्ट कळली असे जान्हवी म्हणाली.

आपण लवकरच लग्न करणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेतही अर्जुनने यावेळी दिलेत. लग्नासाठी आता तू तयार आहेस का,असे करणने विचारले असता पूर्वी मी लग्न या गोष्टीसाठी तयार नव्हतो. पण आता मी लग्न करायला तयार आहे, असे तो म्हणाला.

Copy