अरे बापरे….जिल्ह्यात कोरोनाने चार हजारांचा टप्पा ओलांडला

0

जिल्ह्यात नव्याने 209 रुग्णांची भर

जळगाव– जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल 209 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 4007 झाली आहे. सर्वाधिक कोरोनाबाधीत हे जळगाव शहरात 55 रुग्ण आढळले. दरम्यान आज सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला, मृत्यूचा आकडा अडीचशेच्यावर गेला आहे.

जिल्ह्यात आज तब्बल 209 रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहर 55, जळगाव ग्रामीण 13, अमळनेर-8 भुसावळ-18 भडगाव-13 बोदवड-1; चाळीसगाव 4 ;चोपडा-11; धरणगाव-6; एरंडोल 28 , जामनेर 7, मुक्ताईनगर 1, पाचोरा-1 ; पारोळा-22, रावेर 10; यावल 11 असे रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान शुक्रवारी दिवसभरात सहा कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील 3, बोदवड, पाचोरा व जामनेर तालुक्यातील प्रत्येक एका रुग्णाचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy