अरबाज खान पुन्हा एकदा अडकणार विवाहबंधनात

0

मुंबई : अरबाज खान पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये सुरु आहे. गेल्यावर्षी अरबाजनं पत्नी मलायकाशी घटस्फोट घेतला. त्यानंतर अरबाज आणि मॉडेल जॉर्जिया अँड्रीयानी एकमेकांना डेट करू लागले. अनेक कार्यक्रम आणि पार्टीमध्येही अरबाज आणि जॉर्जिया एकत्र दिसतात.

अरबाज आणि जॉर्जियाच्या नात्याला खान कुटुंबानं मान्यता दिली असल्याचं दिसून येत आहे. अरबाज आणि मलायका गेल्या १८ वर्षांपासून एकत्र नांदत होते. त्यांच्या घटस्फोटानंतर अनेक अफवांना पेव फुटलं मात्र या दोघांनीही या अफवा खोडून काढल्या.

घटस्फोटानंतरही अनेक कौटुंबिक कार्यक्रमासाठी अरबाज आणि मलायका एकत्र आले. घटस्फोट झाला असला तरी या दोघांनीही आपली मैत्री मात्र कायम टिकवली.