अयोध्येत उभी राहणार भगवान रामाची भव्य मूर्ती; ‘स्टॅचू ऑफ युनिटी’पेक्षाही अधिक असणार उंची

0

लखनऊ: सध्या देशभरात राम मंदिराचा मुद्दा गाजतो आहे. शिवसेनेने राम मंदिराच्या मागणीसाठी अयोध्या दौरा केला आहे. दुसरीकडे विश्व हिंदू परिषद (विहिप) आज धर्मसभा घेत आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रभू रामाच्या भव्य मूर्तीची निर्मिती करण्याची तयारी सुरु केली आहे. अयोध्येत उभारण्यात येणारी रामाची मूर्ती ही गुजरातमध्ये नुकतेच उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅचू ऑफ युनिटी’ या पुतळ्यापेक्षाही मोठी असणार आहे असा दावा योगींनी केला आहे.

योगी आदित्यनाथ यांना एक प्रेजेंटेशन देण्यात आले आहे. त्यात ही मूर्ती २२१ मीटर उंच असणार आहे असे दाखविण्यात आले आहे. त्याला योगींनी मान्यता दिली आहे.