अयोध्येत उद्या शरयू आरती सुरू होताच भुसावळ विभागातील मंदिरांमध्येही होणार महाआरती

0

श्रीरामाच्या जयघोषाने मंदिरांमध्ये पोहोचणार शिवसैनिक ; अयोध्येतील नया घाटावर होणार महाआरती

भुसावळ- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी सायंकाळी अयोध्येतील नया घाटावर शरयू आरती करणार आहेत. त्याचवेळी देशाच्या कानाकोपर्‍यातून असंख्य शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी, रामभक्त विविध मंदिरांमध्येही महाआरती करणार आहेत. आहे. भुसावळ विभागातील भुसावळसह यावल व वरणगाव तसेच अन्य ठिकाणी महाआरती केली जाणार असून राम मंदिरांमध्ये घंटनिणाद होणार आहे. शिवसैनिकांसह हजारो आबालवृद्ध त्यात सहभागी होणार असून महाआरतीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी शिवसेना शाखांमधून शेकडो शिवसैनिक प्रभू श्रीरामांचा जयघोष करत दुचाकी रॅलीने दाखल होणार आहेत.

भुसावळात विलास पारकरांकडून आरती
भुसावळ- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येतील नया घाट येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजता शरयू आरती करणार आहेत. त्याचवेळी भुसावळच्या मंदिरांमध्ये घंटानाद सुरू होणार आहे. भुसावळ येथील म्युनिसीपल पार्क येथील राम मंदिरात सायंकाळी साडेपाच वाजता शिवसेना भुसावळ शहराच्या वतीने महाआरती केली जाणार आहे. या महाआरतीसाठी रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर व भुसावळ शहर विधानसभा संपर्क प्रमुख विश्राम साळवी खडका, किन्ही, साकेगाव, कंडारी, साकरी, कुर्‍हा, वरडासीम, गणातील व ग्रामीण भागातील ज्येष्ठ शिवसैनिकांसह आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक, युवासैनिक, ग्राहक संरक्षण कक्ष, रेल कामगार सेना, महिला आघाडी, शिक्षकसेना, वाहतूक सेना पदाधिकारी व कार्यकर्ते आणि हजारो नागरीक या महाआरतीमध्ये सहभागी होतील, अशी माहिती शिवसेना भुसावळ तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी दिली.

वरणगावात संजय शिरोडकर करणार महाआरती
वरणगाव- भुसावळ तालुक्याच्या वतीने 24 रोजी सायंकाळी 5.30 वा.जता राम मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. भुसावळ ग्रामीण विधानसभा संपर्क प्रमुख संजय शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव, हतनूर, तळवेल, पिंप्रीसेकम, दीपनगर, पिंपळगाव गणातील व गटातील, ग्रामीण भागातील हजारो शिवसैनिक या महाआरतीमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती उपजिल्हा संघटक विलास मुळे यांनी दिली आहे. ज्येष्ठ शिवसैनिकांसह आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक, युवासैनिक, ग्राहक संरक्षण कक्ष, शिक्षकसेना, रेल कामगार सेना, महिला आघाडी, वाहतूक सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन भुसावळ शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

यावलच्या श्रीराम मंदिरातही होणार महाआरती
यावल- शिवसेना व युवासेना शहर व तालुका यावल यांच्यावतीने महा आरती सातोद रोडवरील श्री राम मंदिरात (श्री शनि मंदिर) सायंकाळी साडेपाच वाजता महाआरती होणार आहे. शिवसेना व युवासेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक व युवासेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, जिल्हा उपसंघटक दीपक बेहेडे, रवींद्र पवार, तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, तालुका संघटक गोपाल चौधरी, उपतालुका प्रमुख शरद कोळी, राजू काठोके, योगेश पाटील, विनायक पाटील,उपतालुका संघटक पप्पू जोशी, एल.व्ही.पाटील, रोहिदास महाजन, धनराज पाटील, महिला तालुका संघटक रजनी पाटील, फैजपूर शहरप्रमुख अमोल निंबाळे, शहर संघटक सुनील बारी, माजी तालुकाप्रमुख विजयसिंग पाटील, कडू पाटील, आप्पा चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भानुदास चोपडे, आदिवासी सेना तालुका संघटक हुसेन तडवी, अल्पसंख्यांक आघाडी तालुका संघटक अजहर खाटीक, युवा सेना तालुका अधिकारी गोटू सोनवणे, शहर अधिकारी सागर देवांग, महिला शहर संघटक रेखा चौधरी, सपना घाडगे यांनी केले असल्याचे शहर उपप्रमुख संतोष धोबी, मोसीन खान, किरण बारी, अनिल पाटील, योगेश चौधरी, आदिवासी तालुका संघटक भारसिंग बारेला आदींनी कळवल्याचे शिवसेना प्रसिद्धी प्रमुख संतोष वाघ कळवतात.