Private Advt

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरांसाठी नगरसेवक पिंटू कोठारींना दिला 51 हजारांचा निधी

0

भुसावळ : अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण करण्यासाठी संपूर्ण भारतभर राम जन्मभूमी निधी व संपर्क अभियान राबवण्यात येत आहे. राम मंदिर निर्माणसाठी अनेकांनी पुढाकार घेत स्वतःहून पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला असून भुसावळात सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे व दातृत्वाचे धनी असलेले नगरसेवक पिंटू (निर्मल) कोठारी यांनी गुरुवारी वैयक्तीकरीत्या 51 हजारांचा निधीचा धनादेश डॉ.विरेंद्र झांबरे यांच्याकडे सुपूर्द केला. प्रसंगी ब्रिजेश लाहोटी, सोनू चिप्पड उपस्थित होते.

मंदिरासाठी हातभार लागल्याचे भाग्य : निर्मल कोठारी
अध्यात्मिक विचारांचा आमचा परीवार असून राम मंदिरासाठी मला वैयक्तिकरीत्या निधी देता आला हे माझे सौभाग्य आहे. हिंदू धर्माची अस्मिता जपली जावी यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा या भावनेतून मी वैयक्तिक 51 हजारांचा निधी धनादेशाद्वारे गुरुवारी सुपूर्द केल्याचे नगरसेवक पिंटू कोठारी म्हणाले.