अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन

0

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. शुक्रवारी वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

12 जून 1924 रोजी जन्मलेल्या जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश यांनी 1989 पासून 1993 पर्यंत अमेरिकेचे 41वे अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला. राष्ट्राध्यक्ष बनण्याआधी बुश 1981 पासून 1989 पर्यंत उपराष्ट्राध्य होते. त्यांची राजकीय कारकीर्द तीन दशकांची होती.

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैन्यात राहून त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. जॉर्ज एच डब्लू बुश यांनी अमेरिकेला शीतयुद्धामधून बाहेर काढण्यास मदत केली होती. ते टेक्सासचे खासदार होते. याशिवाय ते केंद्रीय तपास यंत्रणा (सीआयए)चे संचालकही होते.

जॉर्ज एच डब्लू बुश यांच्या कार्यकाळातच अमेरिकेने 1991 मध्ये खाडी युद्ध जिंकलं होतं. मात्र पुढच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा बिल क्लिंटन यांच्याकडून पराभव झाला होता.

Copy