अमेरिकेची अर्थव्यवस्था धोक्यात: डोनाल्ड ट्रम्प

0

वॉशिंग्टन : गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिका, चीन देशातील शीतयुद्ध सुरु आहे. गेल्या 2 वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये व्यापारयुद्धाला सुरुवात झाली होती. यामध्ये अमेरिका आणि चीन हे दोन्ही देश एकमेकांच्या उत्पादनांवर कर लावण्याची स्पर्धा करत होते. आता चीनमधील कोरोना व्हायरसने अमेरकिेची झोप उडविली असून अमेरिकेची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने जाऊ शकते, असे संकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे दुकाने, मॉल्स, सिनेमागृहे बंद ठेवण्यात आली आहेत. याचा परिणाम लोकांच्या व्यवसायावर होताना दिसत आहे. अचानक शटडाऊन झाल्याने बेरोजगारी वाढण्याची भीती स्थानिक वृत्तसंस्थांनी व्यक्त केली आहे. लोकांचे उत्पन्न थांबल्याने खर्चही करता येणार नाही. हेच मंदीसाठी मोठे कारण बनणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये मोठी घसरण पहायला मिळत आहे. सोमवारी वॉल स्ट्रीट वरील शेअर बाजार डाऊ जोन्स 3000 अंकांनी घसरला. तर अमेरिकेच्या फेडरल रिझव्ह बँकेने बेंचमार्कव्याजदर 0 ते 0.25 टक्के केला आहे. हा दर आधी 1 ते 1.25 टक्के होता. या आधी 3 मार्चला फेडने 0.5 टक्क्यांची कपात केली होती. फेडने अमरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये 700 अब्ज डॉलर ओतण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 200 अब्ज डॉलरचे सरकारी बाँड खरेदी करण्यात येणार आहेत.

Copy