अमेरिकन नागरीकांना भारतच वाटतो सर्वात सुरक्षित

0

विशेष विमानाने देखील मायेदशी जाण्यास नकार

नवी दिल्ली – भारतात अडकलेल्या अमेरीकन नागरिकांना परत मायदेशी नेण्यासाठी ट्रम्प सरकारने विशेष विमानांची व्यवस्था केल्या नंतर देखील, अमेरिकन नागरीक भारतातच थांबण्याला प्राधान्य देत आहेत. त्यांच्या दृष्टीने कोरोनाच्या संकटसमयी केवळ भारतच सर्वात सुरक्षित देश आहे.

भारतात २४ हजार अमेरिकन नागरीक आहेत. भारतातील आमच्या स्टाफने ८०० अमेरिकन नागरिकांना विशेष विमानाने मायदेशी परतणार का? अशी विचारणा केली. त्यात फक्त १० जणांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अशी माहिती इयन ब्राउनली या अधिकार्‍याने दिली. उर्वरित अमेरिकन नागरीक इथेच थांबण्याला प्राधान्य देत असल्याचे ब्राऊनली यांनी सांगितले. अमेरिकेत करोना व्हायरसमुळे अत्यंत भीषण परिस्थिती आहे. करोना व्हायरसमुळे अमेरिकेत लाखो लोक बाधित असून हजारो नागरीक आपल्या प्राणास मुकले आहेत. त्या तुलनेत भारतात परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे.

Copy