अमीरने घेतली ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’च्या अपयशाची जबाबदारी

0

मुंबई :बॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ बॉक्स ऑफिसवर जोरात आपटला. संपूर्ण बॉलीवूड आणि चित्रपटातील कलाकारांनाही हा खूप मोठा झटका होता. मात्र, या चित्रपटाच्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी आमिर खानने स्वीकारली आहे.

‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५२ कोटींची कमाई करीत अपेक्षा उंचावल्या होत्या. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण पहिल्याच दिवशी चित्रपट पाहिलेल्यांनी आपली नापसंती दाखवली. समिक्षकांनीही चित्रपटाला झोडपले. दुसऱ्या दिवशीची कमाई ३२ कोटीची झाली. पण त्यानंतर हा आकडा घसरतच गेला. देशभर अनेक भाषांमध्ये या चित्रपटाचे वितरण करण्यात आले होते.पण प्रेक्षक प्रचंड निराश झाले. परफेक्शनिस्ट अमीर खानकडून प्रेक्षकांना ही अपेक्षा नव्हती.

आता याची जबाबदारी अमीरने स्वीकारली आहे. कथा लेखनाच्या कार्यशाळेत तो बोलत असताना ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’च्या अपयशाबद्दलचा त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना आमिरने हा चित्रपट पडल्याचे मान्य केले. प्रेक्षकांच्या अपेक्षांना आपण उतरु शकलो नसल्याचे तो म्हणाला.