अमित शहांना सव्वा वर्षांनी शुद्ध आली, याचा मला आनंद

0

जळगाव: महाराष्ट्रराज्य सार्वजिनक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्हा पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तोफ डागली. भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह यांना सव्वा वर्षांनी शुद्ध आली, याचा मला आनंद आहे, अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी अमित शाह यांच्यावर तोफ डागली.पाळधी येथे एक विवाह सोहळ्यात ते पत्रकारांशी
बोलत होते.

शेतकर्‍यांनी आंदोलन कश्या प्रकारे केले पाहिजे यावर शुद्ध सेलिब्रिटिंना आता कुठे आली आहे. शेतकरी साठदिवसांपासून मुंबईतीच्या आझाद मैदानापासून ते थेट दिल्ली पर्यंत आंदोलन करत आहेत. शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि त्यांचा शेतजमिनी हिसकावण्याचा कोणी पकरू नये अश्या शेतकर्‍यांच्या रास्त मागण्या आहेत. पण मग्रूर सरकार त्यांच्याशी बोलणी करायला तयार नाही. आमच्याकडे या, मग चर्चा करू, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. मात्र, जो मूळ पाया आहे. जो पाठीचा कणा आहे, त्याच्या दरवाज्यात जायला हवे, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकारचा आणि सेलेब्रिटिंचा समाचार घेतला.