अमित शहांचा दुसरा कोरोना रिपोर्ट आला…

1

नवी दिल्ली: संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. सामान्य नागरिकांपासून सेलीब्रेटी, राजकीय नेते देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. स्वत: अमित शहांनी कोरोनाचे लागण झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर उपचार झाला असून उपचारानंतर त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. ती चाचणी निगेटिव्ह आली आहे. दिल्ली भाजपाध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांनी ही माहिती दिली आहे.

https://twitter.com/ManojTiwariMP/status/1292341829912821763

२ ऑगस्टला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांच्यावर उपचार झाला असून ते आता निगेटिव्ह आले आहेत. लवकरच त्यांची रुग्णालयातून सुट्टी होणार आहे.

Copy